केज किसान दि.२ गौतम बचुटे
विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
केज तालुक्यातील लाखा येथे एका चाळीस वर्षीय विवाहीतेने नवऱ्याच्या छळाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी मयत विवाहिततेच्या नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार दि. ३१ जुलै रोजी लाखा ता. केज येथे संगिता संतोष रामिष्ट वय (४० वर्ष) हिला तिचा नवरा संतोष नागनाथ रामिष्ट हा याने तिचा शारिरीक व मानसिक छळ करुन त्रास देवुन मारहाण केली. त्या त्रासाला कंटाळुन संगीता हिने लाखा गावातील भाकरे यांच्या विहीरीत पाण्यात उडी मारुन मारुन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास संतोष याने प्रवृत्त केले व तिच्या मरणास तिचा नवरा कारणीभूत आहे. मयत संगिता रामिष्ट हिला दोन मुले व दोन मुली अशी चार अपत्ये असून दोन्ही मुली विवाहित आहेत.
या प्रकरणी मयत संगिता रामिष्ट हिचा भाऊ बळीराम सुंदरराव हंडीबाग (रा. आनेगाव ता. केज) यांच्या तक्रारी वरून संतोष रामिष्ट याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४६४/२०२३ भा दं वि ३०६ विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.