केज किसान ३१
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता त्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी केली असून, बीड जिल्ह्यातील ८७ महसुली मंडळांमध्ये अग्रीम पीकविमा देण्याचे मान्य केले व संबंधित पीकविमा कंपनीस अग्रीम २५% टक्के विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आत महसूल, कृषी व पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करून अहवाल सादर करावा व अग्रीमे विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते.
त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी आज अधिसूचना निर्गमित केली असून महसूल, कृषी व पिक विमा कंपनीने निर्देशित केलेल्या ८७ महसुली मंडळांमध्ये सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे, या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा अधिक असल्याने निकषानुसार ही महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र आहेत व या सर्व महसूल मंडळांमध्ये तातडीने अग्रीम पीक विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश आज निर्गमित केले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे ८७ महसूल मंडळातील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना २५% अग्रीम विमा एक महिन्याच्या आत मिळेल, हे आता निश्चित झाले असून, या कठीण काळात हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदस्य परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले असून, बीड जिल्ह्यातील सर्व ८७ महसुली मंडळांमध्ये अग्रीम पीकविमा देण्याचे मान्य करत संबंधित पीकविमा कंपनीस अग्रीम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे ८७ महसूल मंडळातील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना २५% अग्रीम विमा एक महिन्याच्या आत मिळेल, हे आता निश्चित झाले असून, या कठीण काळात हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
या मंडळांना मिळणार लाभ
बीड, मांजरसुंबा, चौसाळा, पेंडगाव, नेकनूर, पिंपळनेर, राजुरी नवगण, लिंबागणेश, कुर्ला, घाटसावळी, पारगाव सिरस, चऱ्हाटा, येळंबघाट, आष्टी, कडा, धामणगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा, दादेगाव, डोईठाण, आष्टा ह. ना., तिंतरवणी, माजलगाव, गंगामसला, दिंद्रुड, नित्रूड, तालखेड, किट्टीआडगाव, मंजरथ, गेवराई, उमापूर, चकलांबा, मादळमोही, जातेगाव, तलवाडा, रेवकी, सिरसदेवी, कोळगाव, माटेगाव, वडवणी, कवडगाव बु., अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव, बर्दापूर, ममदापूर, राडी, सिरसाळा, नागापूर, धर्मापुरी, पिंपळगाव गाढे, मोहा.
तिंतरवणी, गेवराई, धोडराई, उमापूर, चकलांबा, मादळमोही, जातेगाव, तलवाडा, रेवकी, सिरसदेवी, कोळगाव, माटेगाव, केज, हनुमंत पिंप्री, चिंचोली माळी, मस्साजोग, मोहखेड, तेलगाव, पाटोदा, थेरला, अंमळनेर, कुसळंबह , आष्टी, कडा, धामणगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा, दादेगाव, डोईठाण, आष्टा ह. ना. पाटोदा, थेरला, अंमळनेर, कुसळंब